जळगावात उद्धव ठाकरे यांच्या समोर मराठा आंदोलकांची निदर्शने
जळगाव, दि. 14 - दैनिक सामना मधील वादग्रस्त व्यंगचित्राविरोधात खा. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी करणारे फलक दाखवून पाचोरा (जि. जळगाव) येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आज मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन व डोक्याला आणि हाताला काळे कापड बांधून निषेध व्यक्त केला. या निदर्शनानंतर ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चाही केली. विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी श्री.ठाकरे पाचोरा येथे आले होते. कार्यक्रमस्थळी जात असताना आंदोलकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
