मध्य प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 20 प्रवासी ठार
भोपाळ, दि. 14 - मध्य प्रदेशमधील रतलाम येथे एक बस दरीत कोसळून 20 हून अधिक प्रवासी ठार तर, 10 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस रतलाम येथून मंदसौरच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. आज सकाळी हा अपघात झाला. बस वेगात जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
