Breaking News

पाटण पंचायत समिती सभेत शौचालयाच्या प्रस्तावावरून प्रशासन धारेवर

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) - पाटण पंचायत समितीच्या सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शौचालय बांधणीचे अनुदान 1 कोटी 20  लाखाचा निधी शिल्लक असूनही अनुदानाचे प्रस्ताव मंजूरीस टाळा-टाळ होते तर काही प्रस्ताव गायब होत आहेत, हे टाळण्यासाठी प्रस्तावाबरोबर चिरीमिरी  द्यायची का? असा प्रश्‍न उपस्थित करून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 
पाटण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातून शौचालयांचे प्रस्ताव गायब होतात. त्यामुळे इथला कारभार अत्यंत गचाळ आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी  लोकांनी संबंधितांना ’चिरीमिरी’ द्यायची का? अशी विचारणा करून सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी शौचालयाच्या खात्यात 1 कोटी 20 लाख रूपयांचा निधी  शिल्लक असताना लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जात नाही. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे चांगले उपक्रम तालुक्यात यशस्वी होत नसल्याची खंत व्यक्त करून  शौचालयाच्या प्रस्तावावरून पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रशासनाच्या कृत्यावर सदस्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.
तालुक्यातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होवू नये म्हणून येणार्‍या काळात कोणत्याही परिस्थितीत पाटण तालुका 100 टक्के प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे. यासाठी  पंचायत समितीचे सर्व सदस्य सर्वतोपरी प्रयत्नशील करतील. वेळप्रसंगी या कचर्‍याची विल्हेवाट लावून त्यातून वीजनिर्मितीसाठी आम्ही निधी उपलब्ध करून देवू.  यासाठी  प्रसिध्दी, जनजागृती, सकारात्मकता वाढावी. जे सहकार्य करत नाहीत अशांवर कठोर कारवाई करा. पण पाटण तालुका प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे,  अशी आग्रही मागणी करून राजाभाऊ शेलार यांनी करून पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही उदासिनता पहायला मिळत असल्याचा आरोप केले.  याउलट ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, व्यापारी यांच्यामध्ये जनजागृती करा. प्रभात फेर्‍या बॅनर, बैठका घेवून सर्व घटक एकत्रित  करा, आम्ही यासाठी वाट्टेल तेवढा वेळ द्यायला तयार आहोत. आरोग्याचा प्रश्‍न गंभीररुप धरण करू नये म्हणून एका बाजूला कचर्‍याची विल्हेवाट व दुसरीकडे  अन्य पदार्थ तयार करण्यासाठी तालुक्याचे हित लक्षात घेता आम्ही आर्थिक निधी उभा करू, अशी ग्वाही शेलार यांनी दिली. आरोग्य विभागाच्या आढाव्यात  साथरोग नियंत्रणासाठी तालुक्यातील 115 ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने दुषित असल्याचे आढळून आले असून संबंधीत ग्रामपंचायतींना सुचना देवून  फेरनमुने तपासणीला पाठविले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले.