Breaking News

खेळात परिश्रमाची पराकाष्टा केल्यास यश निश्‍चीत मिळतेः जे. पी. गुप्ता

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 24 -  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांचे  विद्यमाने दि. 22 ते 26 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत सहकार विद्या मंदीर, बुलडाणा येथे राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पर्धा (14/17/19 वर्षाआतील  मुले/मुली) आयोजन करण्यात आलेले आहे.
आज दि.  23 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता सहकार विद्या मंदीर, चिखली रोड, बुलडाणा येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात  आले.  याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून  जे.पी.गुप्ता, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, डॉ. विजय झाडे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा  परिषद बुलडाणा, मा.श्रीमती प्रतिभा देशमुख उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग, अमरावती,  शिवानंद टाकसाळे, अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा,   नेमाने अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
बुलडाणा, नरेंद्र टापरे निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ. सुकेशजी झंवर, मुख्य कार्यकारी संचालक, बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रे.सोसायटी, टी.ए. सोर  शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारार्थी, दिपक जाधव अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा हॅण्डबॉल संघटना, बाळासाहेब तिडके उपविभागीय अधिकारी बुलडाणा प्रामुख्याने  उपस्थित होते.
खेळाडूंनी निवड केलेल्या खेळाचा नियमित सराव कावा.  परिश्रमाची पराकाष्ट करुन खेळात यश संपादन करावे असे प्रतिपादन जे.पी. गुप्ता विभागीय  आयुक्त, अमरावती विभाग यांनी केले.  तर मा.डॉ.श्री. विजय झाडे जिल्हाधिकारी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगीतले की, उनाचे चटके मिळाले तरच  सावलीचा आनंद मिळेल.  त्यामुळे त्याप्रमाणे खेळ खेळण्याचे सामर्थ ठेवण्यास निश्‍चीतच खेळाचा आनंद घेता येईल. खेळ खेळण्याचे सामर्थ ठेवा.
सर्वप्रथम मोमेन्टो व स्वामी विवेकानंद यांचा विचारग्रंथ देऊन सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.  तद्नंतर प्रमुख अतिथींचे शुभहस्ते ध्वजारोहण  करण्यात आले व मशालद्वारे ज्योत पेटविण्यात आली.
उद्घाटन  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मा.श्रीमती प्रतिभा देशमुख उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग यांनी केले.  त्यांनी सांगीतले की  राज्यस्तर स्पर्धेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग आहे.  त्यांची निवास, भोजन, मैदान व्यवस्थेबाबत सविस्तर सांगीतले व खेळाडूंना भरभरुन शुभेच्छा  दिल्या.  मशाल प्रज्वलीत करुन व फटाक्यांच्या आतीषबाजीत मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात  आले.  तसेच सर्व अतिथींचे शुभहस्ते मैदानाचे पुजन करुन, सलामीचा सामना पुणे विरुध्द अमरावती 19 वर्ष मुले यांच्या संघाचा मान्यवरांनी परिचय करुन  घेऊन, सामन्याला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीमती उमा समदुरकर यांनी तर आभार अशोक गिरी जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा  यांनी केले.