विधान परिषदेसह सर्व निवडणुका स्वबळावर लढणार : आ. पाटील
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) - पक्षाचा दिल्लीत निर्णय झाला आहे. कसल्याही परिस्थितीत येवू घातलेल्या सहाही निवडणुकीत स्वबळावर काँग्रेस निवडणूका लढवणार आहे. राष्ट्रवादीने आघाडीधर्म कधीच पाळला नाही. परवा जे धस बोलले ते चुकीचे आहे. तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी जागेच्या प्रश्नावरुन मेडिकल कॉलेजचे घोंगडे भिजत ठेवले. सातारा जिल्ह्यातही अनेक विकासकामांना राष्ट्रवादीने खो घातल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी अॅड. विजयराव कणसे, यांच्यासह निरीक्षक ताहिर मुलाणी, अभय छाजेड, सुरेश शिंदे, रजनी पवार, धनश्री महाडिक उपस्थित होते.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेत आमची संख्या मोठी असताना तत्कालिन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे यांच्याशी चर्चा केली होती. रामराजेंनी त्यावेळी अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद आमच्याकडे राहू द्या, सभापती पदामध्ये विचार करु, असे सांगितले होते. परंतू त्यानुसार वागले नाहीत. दिलेला शब्द पाळत नाहीत. दिल्लीत निर्णय झाला आहे. येवू घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत, विधान परिषदा यासह सहाही निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन दिवसात इच्छूकांची यादी आम्ही जाहीर करणार आहोत. जिल्ह्यात शिवसेना-भाजपाची भिती नाही. मात्र राष्ट्रवादीपासून धोका आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असता, आतापर्यंत इमारत उभी राहिली असती. तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या चुकीच्या धोरणामुळे अजूनही खोळबले आहे. कराड विमानतळाचा प्रश्न अजून पिचत पडला आहे. 100 एकर जमीन द्यायला शेतकरी तयार आहेत. मात्र, डॉ. भारत पाटणकर यांना बाहुले म्हणून कोणी उभे केले. डबल गेम खेळायचे हे यांच्याकडून शिकायला मिळते, असा त्यांनी आरोप केला.