Breaking News

मुस्लिम समाज आरक्षणाला भाजपाचा पाठींबा-बबनराव लोणीकर

परभणी, दि. 24 - मागील काँग्रेस राष्टˆवादी काँग्रेसच्या सरकारने केवळ केवळ मताचे राजकारण करून मराठा,मुस्लिम धनगर समाजाचा मतांसाठी वापर करून  सत्ता भोगली आहे असे जिंतूर येे राष्टˆवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नामदेवराव आदमाणे यांच्या भाजपा प्रवेशा संदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
जिंतूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ता राष्टˆवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नामदेव आदमाणे यांनी आज भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी राज्याचे पाणी पुरवठा  मंत्री यांनी त्यांचा सत्कार करून प्रवेश निश्‍चित केला.यावेळी व्यासपीठावर भाजपचे  उदयोग आघाडीचे  प्रदीप पेशकार, बाबासाहेब जामगे, माजी आमदार विजय  गव्हाणे, मंगलताई मूदंगलकर, खंडेराव आघाव,रबदडे मामा, गणेश काजळे, बंडू लांडगे,शिवहारी खिस्ते सुरेश आदमाणे,अस्लम चाऊस, राजेश घनसावंत, विलास  गीते,रमेश पालवे हे उपस्ति होते.
तसेच ते पुढे बोलताना सांगितले की, आज पर्यंत मराठा समाजातील अनेक मंत्री,आमदार खासदार झाले तसेच या महाराष्टˆ राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा चार वेळा  मराठा समाजातील झाले यांनी का दिले नाही मराठा समाजाला आरक्षण आज पर्यंत गावच्या सरपंचा पासून तर दिल्ली पर्यंत मराठा समाजातील नेते आहेत त्यांनी  शाळा कॉलेज ,कारखाने काढून फक्त भष्टाचार केले तसेच सतेत इतके  दिवस असतांना मराठा समाज आठवला नाही का?   असा सवाल त्यांनी यावेळी उपस्ति  केला.
तसेच त्यांनी राज्य सरकारने आता पर्यंत राबविलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.  आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाणार  असल्याचे सांगितले. तसेच भाजपाचा सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा या शहराला विकासा पासून दूर ठेवणार्‍या दोन्ही नेत्यांना या वेळी शहरातील जनता  सुज्ञ असून त्यांना नकीच सते पासून दूर ठेवेल.असा विश्‍वास व्यक्त केला. आगामी नागरपरिषदेत भाजपा कडून आम्ही जिंतूर शहराच्या विकासाला चालना  देण्यासाठी खंबीर पणे उभी राहील असे सांगितले व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा आहे असेही सांगितले.परंतु मराठा समाजाचा आरक्षणवर  कोणतेही भाष्य करण्याचे यावेळी त्यांनी टाळले.
यावेळी अनेकानी भाजपा मध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पालवे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश आदमाणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी किशोर जाधव, गजानन रोकडे,चंद्रकांत वाव्हळ, गजानन वाघमारे, कैलास आदमाणे, गणेश काळे,विलास वाव्हळ,नागेश आकात, अमोल गरड,  गजानन हजारे यांनी प्रयत्न केले.