Breaking News

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू, दि. 27 - काश्मीरमधील आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.  आरएसपुरामधील हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला असून सीमावर्ती भागातील सहा नागरीकही जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्युत्तरादाखल भारताकडूनही गोळीबार करण्यात आला. मंगळवारीही पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात येत होता. यात 11 भारतीय नागरिक जखमी  झाले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 2 जवान ठार झालेत. पाककडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या  पार्श्‍वभूमीवर सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण आहे.