Breaking News

नऊ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्त्या

औरंगाबाद, दि. 27 - सासरच्या जाचाला कंटळून नऊ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कांचन चंद्रकांत  आहिरे असे मृत महिलेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी कांचन हिचा विवाह नारेगाव येथील चंद्रकांत अहिरे यांच्याशी झाला होता. ती नऊ महिन्यांची गर्भवती होती.  सोमवारी सकाळी कांचन शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती, परंतु दुपार झाली तरी घरी परत आली नाही. घरच्यांनी तिचा शोध घेतला असता  ती गावाबाहेरील विहिरीत पडल्याचे समजले. चिकलठाणा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. तिचा मृतदेह बाहेर  काढण्यासाठी तब्बल एक दिवस लागला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सासरच्या जाचाला कंटाळून तिने  आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.