Breaking News

झटापटीत पोलिस दुचाकीस्वार जखमी

रेठरेधरण, दि. 26 -  पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदीवेळी थांबण्याचा इशारा केल्यावर न थांबता पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा त्याच्याच गाडीखाली अडकून पाय मोडला, तर यामध्ये पोलिसही जखमी झाला. ही घटना चारच्या सुमारास घडली.
इस्लामपूर शहर वाहतूक विभागाचे हवालदार बजरंग शिवाजी ढोकळे सहकार्‍यांसमवेत वाघवाडी फाटा येथे नाकाबंदी करुन वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. यावेळी शहाजी भीमराव पाटील (रा. येडेनिपाणी) दुचाकीवरुन येताना पोलिसांना दिसले. ढोकळे यांनी गाडी थांबविण्याची सूचना केली. परंतु पाटील यांनी गाडीबरोबर ढोकळे 10 ते 15 फूट लांब फरफटत गेले. या झटापटीत पाटील यांची गाडी त्यांच्याच पायावर पडली आणि पाय मोडला. यामध्ये ढोकळे यांची पँट फाटली तसेच तेही किरकोळ जखमी झाले. जखमी शहाजी पाटील व पोलिस कर्मचारी ढोकळे यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.