Breaking News

स्पाईसजेटच्या दुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून 9 किलो सोने जप्त

पुणे, दि. 26 - स्पाईसजेटच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल 9.1 किलो सोने सापडले आहे. या सोन्याची किंमत 2.8  कोटींच्या घरात आहे.
स्पाईसजेटच्या दुबई-पुणे विमानात आज पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घटली. टॉयलेटमध्ये एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये हे सोनं गुंडाळलेले होते. पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. विमानतळावरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही कारवाई असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.