Breaking News

शासनाच्या नवीन बांधकाम नियमावलीमुळे शहराचा सर्वांगीण विकास होईल

। मनपा नगर रचनाकार राजेश पाटील यांचे प्रतिपादन

अहमगनगर, दि. 29 - सर्वसामान्यांच्या गरजा विचारात घेऊन नवीन बांधकाम नियमावली राज्य शासनाने तयार केलेली असून, शहरातील आर्किटेक्ट व  इंजिनिअर्स याचा त्यांनी कौशल्याने वापर करावा. नवीन नियमांचा हेतू म्हणजे शहराच्या सर्वांगीण सूत्रबद्ध विकासाच्या दृष्टीने उचलण्यात आलेले एक महत्त्वाचे  पाऊल आहे, असे प्रतिपादन मनपाचे नगर रचनाकार राजेश पाटील यांनी केले.
नगर येथे आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्हेअर्स असोसिएशनच्या वतीने नवीन नियमावलीसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र शासनाने नगरसह इतर 15 ड वर्ग महापालिकांसाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. नियमावलीच्या माहिती पुस्तिेकेचे प्रकाशन श्री.  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आर्किटेक्ट इंजि. असो.चे अध्यक्ष मकरंद देशपांडे, इंजि. के. वाय. बल्लाळ, अंबुजा सिमेंटचे आमिष दिसने, पंकज जहागिरदार, प्रकाश जैन, प्रफुल्ल  सुराणा, अशोक सातकर, पवन शिंदे, चंद्रशेखर जगताप, विजयकुमार पादिर, कमलेश पितळे, संजय पवार, अनिल मुरकुटे, संदीप गवळी, संजय चांडवले, किरण  वाघे, तुषार चांडक, राजकुमार मुनोत आदींसह असो.चे सदस्य उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, रस्ते व खुली जागा यामध्ये जाणार्‍या क्षेत्राचा यापुढील काळात चटई क्षेत्र निर्देशांकाच्या स्वरूपात मोबदला मिळणार असल्याने रेखाकंन  सादर करताना प्रशस्त रस्ते प्रस्तावित करावेत. पार्किंगच्या समस्येने सर्वजण त्रस्त असून, यापुढे मोठे गृहप्रकल्प, तसेच सार्वजनिक इमारतींना प्रशस्त पार्किंग  असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. सभासदांनी याप्रसंगी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली. प्रास्ताविकात मकरंद देशपांडे म्हमाले की,  बहुचचित नियमावली शासनाने लागू केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आपण सरकारला धन्यवाद देतो. नवीन नियमामुळे शहरात उंच इमारती बांधण्यास परवानगी  मिळेल. त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढेल. सभासदांना शासकीय स्तरावर येणार्‍या अडचणींचा पाठपुरावा करून अडचणी दूर केल्या जातील, असे ते म्हणाले.  कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रदीप तांदळे, अजय दगडे, एकनाथ जोशी, रमेश कारले, इक्बाल सय्यद, अनिल धोकरिया, सलीम शेख, जितेश सचदेव, भालचंद्र  सोनवणे, सचिन म्हसे, पवन शिंदे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन रत्नाकर कुलकर्णी यांनी केले, तर सचिव पंकज जहागिरदार यांनी आभार मानले.