Breaking News

धनुर्विद्या स्पर्धेत ओम गुरूदेवचे यश

अहमदनगर, दि. 29 - पुणे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात ओम गुरूदेव उच्च माध्यमिक गुरूकूलाचा विद्यार्थी आशुतोष बडे याची रिकर्व्ह  राऊंड प्रकारात उत्तुंग यश मिळविले. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा नुकत्याच श्री विनायक विद्यालय वरवडे,  सोलापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर, अहमदनगर शहर व ग्रामीण असे संघ सहभागी झाले होते. राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या  स्पर्धा अलिबाग येथे होणार आहेत. या विद्यार्थ्यांला प्रशिक्षक भ्ाूषण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचा आश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आल्या.  यावेळी आश्रमाचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे विश्‍वस्त वसंतराव  आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश गिरमे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलिक, प्रा. विजय शेटे, बापु  पुणेकर आदिंनी अभिनंदन केले.