Breaking News

घुले याच्या प्रभागातील समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा

। आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन । प्रभाग 24 मधील श्री विशाल गणपती मंदिर ते कौठीची तालिम रस्ता काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 28 - माळीवाडा परिसराचा विकास झपाटाने होत आहे. तितक्याच प्रमाणात समस्याही वाढत आहेत. प्रभागातील नगरसेविका निता घुले यांनी  दुरदृष्टीने विचार करुन प्रभागातील नियोजनपूर्वक विकास कामे करुन या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील काळात  समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. मध्यवस्तीचा भाग असल्याने गल्ली-बोळात विकास कामे करताना अनेक अडचणीत येत असतात, तेव्हा  नागरिकांनीही सहकार्य केल्यास वारंवार येणार्‍या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन  आ.संग्राम जगताप यांनी केले. 
प्रभाग क्र.24 मधील श्री विशाल गणपती मंदिर ते कौठीची तालिम पर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या  हस्ते झाला. याप्रसंगी आ.संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमास नगरसेविका निता घुले, नगरसेवक संजय घुले, अविनाश घुले, विष्णूपंत म्हस्के, रमेश शेरकर,  मुकुंद शेरकर, मोहन कदम, नट्टू आंबेकर, महेश आरडे, प्रशांत शेरकर, खंदारे,  शशिकला पुंड, सुमन रासकर, विजया चंगेडिया, सविता शेरकर, कल्पना बनसोड  आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.जगताप म्हणाले, नगर शहराचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, प्रत्येक प्रभागातील मुलभुत समस्या सोडविण्यावर भर आहे.  प्रभागातील नगरसेवकांच्या मनपा निधी तसेच आपला आमदार निधी जेथे आवश्यक असेल तेथे देऊन विकास कामे करत आहोत. नगरसेविका निता घुले यांनी  आपल्या प्रभागतील अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात यश मिळविलेले आहे, थोड्याफार समस्या या टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे  ग्रामदैवत असल्याने शहराबरोबरच जिल्ह्यातून या भागात नागरिक येत असल्याने याठिकाणी विकास कामांबाबत आपले विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी निता घुले म्हणाल्या, गणपती मंदिर ते कौठीची तालिम या परिसरात ड्रेनेज लाईन, बंद पाईप गटार, पाण्याची लाईन इत्यादी कामे पूर्ण झाली असून आता  सिमेंट क्रॉक्रीटचे रस्त्यांचे काम दिवाळीपूर्ण होईल. त्यामुळे दिवाळीत महिलांना रांगोळीसाठी गुळगुळीत रस्ता होणार आहे.  प्रभागात हातमपुरा, गोंधळे गल्ली, शिंदे  गल्ली, वसंत टॉकीज रोड आदि ठिकाणची विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली असून, पारगल्ली, भिस्तगल्ली, फुलारगल्ली, शेरकरगल्ली, गुलाबसिंह कंपाऊड  आदि ठिकाणी सबमर्सिबल पंप व पाण्याची टाकी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
याप्रसंगी अविनाश घुले, विष्णूपंत म्हस्के, रमेश शेरकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अर्चना सुडके, स्वाती शिंदे, जयश्री कराळे, राणी आंबेकर,  तुळसाबाई डबरे, उषा व्यवहारे, जयश्री चिपाडे, सत्यभामा आंबेकर, विजया सांगळे, लता शेरकर, स्वाती भुतारे, आशा इवळे,  उषा आंबेकर, राधा इवळे, चंद्रकला  आंबेकर, स्वाती साठे, कल्याणी आंबेकर, लता नन्नवरे, मुरलीधर पाखरे,  मयुर भापकर, विकी सांगळे, सुनिल गवते, सनी साठे, अभी खंदारे, शुभम भापकर,  संदिप गोडसे, शुभम आंबेकर, रोहित व्यवहारे, सौरभ जाधव, श्याम मोकाटे, श्रीकांत आंबेकर आदि उपस्थित होते.