Breaking News

प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी शपथ

अहमदनगर, दि. 28 - यंदाच्या वर्षी प्रदुषणमुक्त दिपावली सन साजरा करण्यचा निश्‍चय जिल्हयासह राज्यातील विविध शाळांनी घेतला आहे. यामध्ये  अहमदनगरमध्येही कै.सौ.सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय, नेवासा या विद्यालयातील एक हजार विद्यार्थीनींनी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी  शपथ घेतली आहे.
दरवर्षी लाखो रुपयांचे फटाके उडविणार्‍या बालकांनी यंदा प्रदुषणमुक्त दिपावली सन साजरा करण्याचा निश्‍चय केला आहे.याचा परिणाम मोठ्या प्रमाणात फटाका  मार्केटवर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा अनेक शांळांनी प्रदुषणमुक्त दिपावली साजरा करण्याचा संकल्प केल्याने यंदा दिपापली तोंडावर आली असली  तरी फटाके मार्केटकडे जास्त गर्दी दिसत नाही. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर फटाके घेवुन बसलेल्या छोट्या व्यवसायीकांनीही यंदा सांगीतले की, यंदा  फटाक्याला मागणी घटली आहे. तसेच न्यायालयाच्या नियमांचे पालन ही करायचे असल्याने मोठे आवाजाचे फटाके यंदा बाजारात कमी प्रमाणात पहावयास मिळत  आहे. तसेच प्रदुषणमुक्त दिपावली साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचाही वापर सुरु केला आसुन मुले प्रदुषण मुक्त दिपापलीसाठी सज्ज झाले असून  गेल्या दोन दिवसापासुन शहरातील बाजरपेठामध्ये कपडे व मिठाईच्या दुकानातील गर्दी वाढू लागली आहे. शहरासह जिल्हयात यंदा फटाक्यांची विक्री कमी  होण्याची शक्यताही जाणकांरांनी यावेळी व्यक्त केली आहे.