Breaking News

मोदींचा अश्‍वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचे ’प्रियांका’स्त्र

नवी दिल्ली, दि. 25 - प्रियांका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्या आहेत. प्रियांका गांधींच्या या उपस्थितीमुळे त्या राजकारणात सक्रीय व्हायचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रियांकांना उतरवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच काँग्रेस प्रियांका गांधींच्या निवडणूक प्रचाराच्या तारखा घोषित करणार आहे. 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींच्या जन्मदिनीच प्रियांकांना उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारीही काँग्रेसनं केली असल्याची माहिती मिळत आहे.