Breaking News

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणार्‍यांच्या यादीत कोहली चौथा

मोहाली, दि. 25 - मोहाली वनडेमध्ये विराट कोहलीनं नाबाद 154 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमधली कोहलीची ही 26 वी सेंच्युरी आहे. या सेंच्युरीबरोबरच कोहली वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणार्‍यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. 26 सेंच्युरी मारताना कोहलीला फक्त 174 इनिंग लागल्या आहेत.
सर्वाधिक सेंच्युरी मारणार्‍यांच्या यादीत 49 सेंच्युरीसह सचिन तेंडुलकर या यादीत पहिला आहे. तर 30 सेंच्युरी मारणारा रिकी पॉईंटिंग दुसर्‍या आणि 28 सेंच्युरी मारणारा सनथ जयसुर्या तिसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या वनडे क्रिकेट खेळणार्‍यांमध्ये कोहलीच्या मागे 24 सेंच्युरी मारणारा एबी डिव्हिलियर्स आणि 22 सेंच्युरी मारणारा हशीम आमला आहे. मोहालीच्या या वनडेमध्ये रेकॉर्डचा पाऊस पडला आहे. कोहलीबरोबरच धोनीनंही या मॅचमध्ये तीन रेकॉर्ड केली आहेत.