हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर तब्बल 10000 ची कॅशबॅक ऑफर
नवी दिल्ली, दि. 25 - देशातील दुचाकीचे उत्पादन करणार्या कंपन्यांमध्ये आग्रगण्य असलेल्या हिरोने यंदाच्या दिवाळीत आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवर तब्बल 10000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर सरकारकडून उत्तम प्रदर्शन करणार्या ई-स्कूटर्सवरील 17000 च्या सबसिडीपेक्षा वेगळी आहे.
हिरोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देणार्या पेटीएमसोबत सहकार्य करार केला आहे. तसंच लीथियम इलेक्ट्रिक बाईकवर पेटीएममार्फत 10000 ची कॅशबॅक दिली आहे.
हिरोच्या ग्लोबल बिझनेस विभागाचे सीईओ सोहिंगर गिल यांनी सांगितले की, हिरो इलेक्ट्रिकने 2020 पर्यंत 30 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या भारतीय रस्त्यावर उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही घोषणा याचाच एक भाग आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. हिरो इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मोठी सीरीजच भारतीय बाजारपेठेत उतरवली आहे. यामध्ये ऑप्टिमा, मॅक्सी, क्रूज, निक्स आणि फोटोन तसेच ई-स्प्रिमट मॉडेल आदी प्रमुख दुचाकींचा समावेश आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हिरो इलेक्ट्रिकने गाड्यांची आवड असणार्या ग्राहकांसाठी निक्स स्कूटर्स बाजारपेठेत लॉन्च केली आहे. यामध्ये लीथियम ऑयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, हिरोने निक्स स्कूटर्सवर 5000 रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे.