Breaking News

गंगाखेड-परभणी महामार्ग बनला मृत्युचा सापळा!


परभणी, दि. 26 - परभणी ते गंगाखेड जाणार्‍या महामार्गाची अवस्था दिवसें- दिवस बिघडत जात असल्याने   वाहतुक करणार्‍या प्रवाशांसाठी हा रस्ता मृत्युचा सापळा बनला असल्याचे चिंताजनक प्रतिक्रिया वाहनधारक व प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने रस्त्यावर जागो-जगाी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु केले नसल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे. तरोडा फाटा ते गंगाखेड पर्यंत रस्त्यावर सर्वत्र खड्डेच-खड्डे पडले असल्यामुुळे वाहन चालवतांना चालकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातुन इतरत्र जाण्यासाठी हा महत्वपूर्ण महामार्ग असुन लातुर,बीड, उस्मानाब व पंढरपूरकडे जाण्यासाठी या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहने वाहतुक करताता. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी आणि रस्त्याची दुरावस्था यामुळे रस्त्यावर सखरुप प्रवास करणे शक्य नसल्यामुळे नागरीक गंगाखेड-परभणी रस्त्यावरुन प्रवास करतांना  प्रवासी धोक्याची घटीका मोजत असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. रस्त्यात-खड्डे की खड्यात रस्तेचे असे चित्र- विचीत्र चित्र निर्माण झाले असतांना देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं व प्रशासकीय यंत्रणेने या महामार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावरील खड्यातील दगड वर येवून अपघात होत आहेत. संध्याकाळच्या वेळे खड्यात पडून दुचाकीस्वार जख्मी होत आहे. शिवाय समोरून येणार्‍या वाहनाच्या गतीचा अंदाज न लागल्यामुळे देखील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. वाहतुकीचे नियम प्रशासनाने कागदोपत्री घोडे नाचवून प्रत्यक्षात रस्त्यावरची अनास्था प्रदर्शीत करणे पसंत केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसाठी असणार्‍या दिशादर्शक पाठ्या व संध्याकाळी दिशा दर्शविण्यासाठी असणारे सांकेतांक गंगाखेड-परभणी महामार्गावरुन हद्दपार झाले आहेत.  त्यामुळे शासन व प्रशासनाच्या या दुर्लक्षीतपणामुळे जिल्ह्यातीलच नव्हेतर या रस्त्यावरुन जाणार्‍या   अनेक प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने या बाबत त्वरीत निर्णय घेवून गंगाखे-परभणी हा वाहतुकीचा महत्वपुर्ण रस्त्या दुरुस्त करुन नागरीकांचा चांगला रस्ता उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जिल्ह्यातील नागरीकांकडून होत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील नागरीक प्रशासनाच्या  विरोधात आंदोलन छेडतील असे संकेत मिळत आहेत.
परभणी(प्रतिनिधी), दि. 26 -