Breaking News

मतदारांना प्रभावीत करणार्‍यांवर कारवाई

जिल्हाधिकारी महिवाल यांचे निर्देश

परभणी/प्रतिनिधी, दि. 26 - जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, शांतता व सुव्यवस रहावी यासाठी मतदारांना प्रभावित करणार्‍या गैरप्रकारांवर, आर्कि बळाचा वापर, संशयास्पद आर्कि व्यवहार, दारुचा अवैध वापर यांच्यावर प्रशासनाची करडी नजर राहणार असून यासंदर्भात सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी वेळीच कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) राजेंद्र खंदारे, नगरपरिषद प्रशासन अधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे, उत्पादन शुल्क, आयकर विभाग, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्ति होते.
नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. महिवाल यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. यावेळी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या. विशेषतः संशयास्पद आर्कि व्यवहारांवर बँक आणि आयकर विभागाच्या समन्वयाने नजर ठेवणे, जिल्ह्यात पाहणीसाठी फिरते तसेच सनिक पकांची नियुक्ती करणे, तसेच निवडणूक काळातील शांतता-सुव्यवस्ेसाठी अवैध अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे, त्यासाठी माहितीची देवाण-घेवाण समन्वयनासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.
 अवैधरित्या मद्यविक्री किंवा विहित कालमर्यादेनंतरही मद्यविक्री, अवैध साठे शोधणे, प्रचार-प्रसिद्धी दरम्यान विरूपणास प्रतिबंध करणे यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देशित करण्यात आले. निवडणूक काळातील आर्कि व्यवहारांबाबत व्यावसायिक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, व्यक्तींनी बँकींग नियमन तरतुदीनुसार सोबत दस्तऐवज, अनुषंगिक माहिती ठेवावी. बँकींग नियमावलीनुसार मोठ्या स्वरुपाच्या आर्कि व्यवहारासाठीची विहित पद्धतीचा काटेकोर अवलंब करावा, जेणेकरून अशा नियमित व्यवहारांबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही, असेही आवाहन सनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील  7 नगरपालिकांच्या निवडणुका ंसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. या निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे  सर्व विभाग, यंत्रणा व संबंधितांनी काटेकोरपणे  पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले. आचारसंहितेचे काटेकोरपणे  पालन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने सनिक स्वराज्य संसंच्या निवडणुकांसाठी आचारसंहितेबाबत जारी केलेले आदेश विविध विभागांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या आदेशांचे, तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी जारी होणार्‍या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयोगाने आदेशात धोरणात्मक निर्णय, शासकीय विश्रामगृहांचा तसेच शासकीय वाहनांचा उपयोग, निवडणूक काळात  भित्तिपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स लावणे,  निवडणूक कालावधीतील सार्वजनिक सणांमधील आचरण, आचारसंहिता  कालावधीतील  राजकीय पक्ष आणि उमेदवार यांची वर्तणूक, सभा व मिरवणुकांचे आयोजन, प्रचार,   मतदानाच्या दिवशीचे आचरण आदींबाबत विविध तपशीलवार सूचना दिलेल्या असून या सर्व सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.