Breaking News

तरुणाईची गरजू महिलांना भाऊबीज

पुणे, दि. 29 - गरजू, निराधार महिलांनीदेखील आपल्या कुटुंबासमवेत  आनंदाने दिवाळी साजरी करावी, यासाठी पूर्व भागातील प्रभात मित्रमंडळ आणि प्रभात  जनप्रतिष्ठानने पुढाकार  घेत या  महिलांना दिवाळी आधीच दिवाळीचे साहित्य आणि धान्य देऊन अनोखी भाऊबीज साजरी केली आहे. 
प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्रमंडळाच्या वतीने आपुलकीची भाऊबीज आयोजित  केली होती. यावेळी विश्‍व हिंदू परिषद पश्‍चिम महाराष्ट्रच्या सदस्य  धर्मसाध्वी ह.भ.प. मंगला कांबळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.  उदय वाडेकर, नीलेश कांबळे, मंगेश शिंदे, गोविंद मोरे, नितीन अरगडे, नितीन राऊत, केतन भागवत, प्रतीक भिसे, अमोल थोरात, ओंकार नाईक, प्रकाश रेड्डी,  सुनीता गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वांनी सभासदांचे अभिनंदन होत आहे. गरजू, निराधात महिलांनीदेखील आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने दिवाळी साजरी करावी  यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.