Breaking News

कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळेल दिशा

। समुपदेशक वृषभनाथ कोंडेकर यांचे मत

पुणे , दि. 29 - पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून भीती दूर करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करणारे वातावरण निर्माण  केले पाहिजे. ज्ञान साहित्य आणि संस्कृतीच्या आधाराने नव शिक्षणाचे मार्ग खुले केले पाहिजेत. पालकांना मार्गदर्शक करणार्‍या कार्यशाळा शासनाने आयोजित  केल्यास मुलांना योग्य दिशा आणि भविष्याची वाट गवसेल, असे मत समुपदेशक वृषभनाथ कोंडेकर यांनी व्यक्त केले. 
बेलसर (ता. पुरंदर) येथील पोलीस पदक सन्मानित नितीन जगताप यांनी ग्रामीण पालक-विद्यार्थी यांच्यासाठी मोफत पालक-पाल्य मार्गदर्शन कार्यशाळेचे  आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी सरपंच नीलेश जगताप, चंद्रशेखर गरुड, बालसिद्धनाथ विद्यालयाचे मुख्याद्यापक अविनाश कांबळे,  नितीन जगताप, माजी सरपंच हनुमंत जगताप, काळास जगताप, राहुल आबनावे, संजय गरुड, शिक्षक नेते संदीप कदम, प्रकाश बुधे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग  जगताप, कामिनी दोडके, वनिता जगताप, सुजाता हिंगणो, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत जगताप, सोपान गरुड, राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित  होते. या वेळी पोलीस कर्मचारी नितीन जगताप, माजी सरपंच नीलेश जगताप यांची भाषणो झाली. स्वागत मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी केले. आभार  माजी सरपंच हनुमंत जगताप यांनी मानले.