Breaking News

राष्ट्रवादीला पिंगली सर्कलमध्ये खिंडार

परभणी, दि. 25 - तालुक्यातील पिंगळी सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत शिवसेनेत जाहिर प्रवेश करून राष्ट्रवादीला भगदाड पाडले आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकीच्या  पार्श्‍वभुमीवर सर्वच पक्ष आपआपसात भीडले असुन इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी साम-नाम-दंड- भेद या युक्तीचा वापर करत जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करवुन घेण्याचा सपाटा काही पक्षातील राजकारण्यांनी लावला आहे. तालुक्यातील पिंगळी सर्कल मध्ये तालुका प्रमुख नंदकुमार आवचार यांनी पुढाकार घेत मागील काही वर्षापासुन शिवसेना संघटन मजबुत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेवुन शासनाच्या अनेक योजना गावाच्या विकासासाठी राबविण्यास प्रारंभ केला. पिंगडगढ नाला नदी पुनरूज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे राबवुन परिसरातील जमीन सिंचनाखाली आणल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. याकामासाठी शासनाकडुन 10 कोटी रूपये निधी मंजुर केला तसेच गावाच्या विकासा करीता अनेक महत्वाचे कामे केल्यामुळे नंदकुमार आवचार यांच्या कार्य प्रणालीवर विश्‍वास ठेवत पिंगळी सर्कल मधील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिव बंधनात स्वत:ला बांधुन घेतले. यामध्ये राजेश दिवसे, उप सरपंच विनायक गांधारे, धोंडीराम आवचार, मारोतराव आवचार, नारायण वावळे, श्रीरंग हनवते, बाळासाहेब वावरे, मारोती वावरे, अच्युत आवचार, बाळासाहेब कुंभार, भगवान आवचार, केशव वावरे, राजेश वावरे, विष्णु आवचार, पंढरी आवचार, सुरेश कुरवारे, संदीप आवचार, सुरेश आवचार आदि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश करत राष्ट्रवादीला रामराम केला. जिल्हा संपर्क प्रमुख आ.सुभाष भोईर, आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, माजी सभापती सोपानराव आवचार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.विवेक नावंदर, साहेबराव गरूड, फैजुल्ला पठाण, सुभाष जोंधळे,गजानन चट्टे, अंकुश मंडळकर आदिंची उपस्थिती होती.