Breaking News

योगगुरू रामदेवबाबांचे 3 दिवस नगरमध्ये योगशिबीर

अहमदनगर (प्रतिनिधी) । 27 - विश्‍वविख्यात योगगुरु श्री रामदेव बाबा यांचे नगरमध्ये 15, 16, 17 नोव्हेंबरला योगशिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी  माहिती उद्योजक गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया व श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत नूसती धावपळ आणि ताण-तणावयुक्त जीवनकार्य करताना आपल्या प्रकृती  स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असलेल्या व्यायामासाठी वेळ नाही. त्यामुळे प्रतिकार शक्तीचा अभाव वाढून किरकोळ आजारासही आपण कंटाळतो. म्हणूनच  व्यायामाचे महत्व योगा-प्राणायामची खरी आवश्यकता असल्याने फिरोदिया परिवाराच्यावतीने हे योगशिबिर आयोजित केले आहे.
यावेळी श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या, सन 2011 मध्ये नगरमध्ये रामदेवबाबा यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नगर जिल्ह्यातून  हजारो योगाप्रेमी नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावेळी उपस्थितांचा उच्चांक निश्‍चित वाढेल असा दावा त्यांनी केला.
नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराची वेळ पहाटे 5 ते 7.30 अशी राहणार आहे. हे शिबीर वाडियापार्क मैदानावर आयोजित करण्यात आले  असून लहानांपासून मोठयापर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क राहिल. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ, हास्यक्लब, योगा-प्राणायाम वर्ग, सर्व  शाळांचे पदाधिकारी, पतंजली योग समिती प्रयत्नशील आहेत. हरिव्दार येथील पतंजली योग समितीचे डॉ. जयदिप आर्या, मुख्य केंद्रीय प्रभारी त्यांचे सहकारी यांचे  मार्गदर्शन लाभणार आहे.