नांदेड-परळी-पनवेल रेल्वे लवकरच धावणार-आत्मलिंग शेटे
खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नाना यश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी), दि. 03 -परळीतील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सुरु करावी अशी खा.प्रितमताई मुंडे यांची अनेक दिवसाची मागणी होती ती रेल्वे बोर्डाने नांदेड-पुणे-पनवेल ही रेल्वे गाडी सुरु करुन पुर्ण केली आहे. त्यामुळे परळीकरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आत्मलिंग शेटे यांनी सांगितले. या बाबत नांदेड डिव्हीजनचे डी.आर.एम.श्री.ऐ.के.सिन्हा यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चा करण्यात आली. असता त्यांनी ही गाडी लवकरच सुरु होईल त्याचा टाईम टेबल ठरला आसुन नांदेड-परळी-पुणे-पनवेल अशी धावणार आहे. तशीच ही गाडी ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होईल असे त्यांनी आत्मलिंग शेटे यांना दुरध्वनी वरुन सांगितले.नांदेड-पुणे-पनवेल गाडी नं.17614 ही गाडी पूर्वी नांदेड पूणे रात्री-11.30 ला परळी हुन निघत असे आता हीच गाडी, नांदेड-पुणे-पनवेल अशी बुधवार-शुक्रवार व शनिवार रोजी परळी येथुन सायंकाळी 8-15 ला निघणार आहे आणि पनवेल येथे सकाळी 9 वा. पोहंचणार आहे तर पनवेलहून गुरूवार, शनिवार व रविवार रोजी सायं. 5.30 वा निघून परळी येथे पहाटे 5.40 वा.पोहंचणार आहे. परळी-मुंबई रेल्वे सुरु व्हावी यासाठी परळीतील सर्व रेल्वे प्रवाशी संघटनानी अनेक आंदोलने केली शेवटी त्याला यश मिळाले आहे. यामध्ये प्रमुख्याने सर्व संघटना अग्रेसर होत्या ही रेल्वे सुरु केल्याबद्दल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व रेल्वे प्रवाशी संघटना सचिव आत्मलिंग शेटे, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, दत्ताप्पा ईटके गुरुजी, डॉ.राजाराम मुंडे, ज्ञानोबा (माऊली) फड, डॉ.शालिनीताई कराड, अभयकुमार ठाकुर, योगेश मेनकुदळे, वैजनाथ सोळके, प्रा.शांती लाहोटी, प्रा.दासु वाघमारे, ज्ञानोबा सुरवसे, अरुण पाठक इत्यादींनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत व लवकरच नांदेड-कुर्ला (हुजर साहेब एक्सप्रेस) ही गाडी दररोज गुरुवारी सकाळी 9.30 वाजता परळीतुन निघते त्याऐवजी ही गाडी रात्री सुरु व्हावी यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या रेल्वे बोर्डाकडुन कांही रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले असल्याचे रेल्वेच्या विभागीय कार्यालयातुन कळविण्यात आले आहे. त्यामध्ये बेंगलोर-नांदेड सायंकाळी 7.30 ऐवजी 7.10 वाजता निघणार आहे. निजामाबाद-पंढरपुर ही गाडी सायंकाळी 8 ऐवजी 9 वाजता, औरंगाबाद-हैद्राबाद ही रात्री 9 ऐवजी 10 वाजता, रेणीगुंटा-औरंगाबाद ही गाडी सायंकाळी 5.40 ऐवजी 5.10, हैद्रबाद पुर्णा ही गाडी रात्री 9.20 ऐवजी 10.05 वाजता या नवीन टाईम टेबल नुसार सुटणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून कळविले असल्याचे आत्मलिंग शेटे यांनी सांगितले.
