Breaking News

शेतकरी आठवडे बाजाराचे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. दि. 03 -‘थेट शेतकरी ते ग्राहक’ या योजनेंतर्गत संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचे आज मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते तसेच कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा चैाक येथे उदघाटन करण्यात आले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पणन व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॅा. किशोर तोष्णीवाल उपस्थित होते.  श्री. देसाई व श्री. खोत यांनी यावेळी राज्यभरातून आलेल्या शेतकर्‍यांच्या विविध स्टॅाल्सना भेटी देऊन भाज्यांची खरेदी केली.