Breaking News

प्रा.टी.पी.मुंडे यांनी केली पाहणी

परळी-वै.(प्रतिनिधी) : दि. 03 - गेल्या दोन दिवसापासुन परळी शहर व परिसरात परतीच्या मान्सुन पावसाने धुमाकुळ घातला असुन परळी शहरातील अनेक वस्त्यामध्ये नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे पाणी शिरले अशाच अशोक नगर, आंबेडकर नगर, प्रबुध्द नगर, आयेशिया कॉलनी, महंमदीया कॉलनी आदी भागातील घरांना काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी आज भेट देवुन पाणी घुसलेल्या घरांची पहाणी केली व पाणी बाहेर काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला सतर्क केले. कांही ठिकाणी तर स्वत:चीच यंत्रणा लावुन त्यांनी नागरीकांना मोठा दिलासा दिला. 
गेल्या दोन दिवसापासुन परळी शहरात पावसाचा जोर वाढला आहे. परळी नगर परिषदेने मान्सुन पुर्व कामे व्यवस्थीत न केल्यामुळे परळी शहराच्या अनेक वस्त्यामधील घरात पाणी शिरले. हजारो नागरीकांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहुन गेले. लाखो रूपयांचे नुकसान झाले. याला केवळ नगर परिषदेचा भ्रष्टाचारी कारभारच जवाबदार असल्याचा आरोप काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केला. परळी शहराच्या पावसाचे पाणी शिरलेल्या वस्त्यांची व नगरांची पहाणी करतांना ते बोलत होते.
प्रा.टी.पी.मुंडे (सर)  यांनी आज अशोक नगर, आंबेडकर नगर, प्रबुध्द नगर, आयेशिया कॉलनी, महंमदिया कॉलनी  आदी भागांना भेटी देऊन पावसाचे पाणी घुसलेल्या घरांची पहाणी केली. तसेच नगर परिषद प्रशासनाला जाब विचारून पाणी काढण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. तर कांही ठिकाणी स्वत:ची यंत्रणा लावुन नागरीकांना दिलासा दिला. दरम्यान नगर परिषद प्रशासनाने यापुढे अशी निष्काळजी केल्यास पालिकेच्या विरोधात काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर)यांच्या मार्गदर्शनाखाली तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.