वाई तालुक्यातील मेंढपाळांकडून हरणाच्या दोन पाडसांना जीवदान
वाई, दि. 01 (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील बावधन-अनपटवाडी येथील तामखडा या डोंगरातील शिवारात आपल्या मेंढ्या चारत असताना सायंकाळच्या सुमारास भर पावसात हरणांची दोन पाडसे दादा कचरे व बरमा कचरे या दोन मेंढपाळांना आढळून आली. त्यांनी पाडसांना आपल्या घरी नेऊन रात्रभर त्यांची सेवा करुन वाईच्या वनविभागाकडे सूपूर्त केली.
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सगळीकडे चिखल, पाणी झाले होते. यावेळी सायंकाळी सहा वाजता चिखलात तडफडत असलेली हरणाची दोन पाडसे दादा कचरे व बरमा कचरे या दोघांना आढळून आली. त्यांनी त्या पाडसांना उचलून आपल्या घरी आणले. त्यांना शेकोटीची ऊब देऊन शेळीचे दूध पाजले. त्यानंतर बुधवारी वाई वनविभागाचे अधिकारी पी. डी. बुधनवर, वनरक्षक सुरेश सूर्यवंशी, वनपाल बी. एस. खुडे यांच्याकडे त्या दोन्ही पाडसांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी दादा कचरे, सोमा कचरे, अनिकेत तांबे, विशाल घोलप उपस्थित होते. दोन्ही पाडसांना कात्रज येथे प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे.