Breaking News

साईकृपा पतसंस्थेकडून लाभांश वाटप

बेल्हे (ता. जुन्नर), दि. 26 - येथील साईकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश व दीपावली भेटीचे वाटप करण्यात आले.
पतसंस्थेच्या प्रत्येक सभासदाला पाच लिटर तेल, साखर, रवा, मैदा वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, उपाध्यक्ष सदाशिव बोरचटे, जिल्हा  परिषद सदस्या स्नेहल शेळके, सर्मथ पॉलिटेक्निकचे संचालक वल्लभ शेळके, सावकार पिंगट, गजानन घोडे, अनिल गुंजाळ, शुभांगी सेलोत, बी. एल. पिंगट, दत्तू  गुंजाळ, सुनील घोडे, नितीन वाघ, सुनील आरोटे आदी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना दीपावली भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या 14 वर्षांपासून संस्थेकडून  सभासदांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात येते.
संस्थेचे सातशे सभासद असून 13 कोटी 75 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने 10 कोटी 10 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. 5 कोटी 30 हजार रुपयांची  गुंतवणूक व 1 कोटी 17 हजार रुपयांचा निधी आहे.
संस्थेचे खेळते भांडवल 16 कोटी 12 हजार रुपयांचे आहे. संस्थेच्या कार्याचा आलेख नेहमी चढता राहिला असून तत्पर सेवा असा संस्थेचा नावलौकिक आहे.