Breaking News

रोलबॉल स्पर्धेत सहकार विद्यामंदिरचे वर्चस्व कायम

बुलडाणा, दि. 26 - स्थानिक सहकार विद्या मंदिराच्या संघाने रोलबॉल स्पर्धेत अमरावती विभागात आपले वर्चस्व पुन्ह एकदा सिध्द केले आहे. सुमारे आठ वर्षापासून सहकार विद्या मंदीराचा संघ राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करीत असून याही वर्षी सहकारचे चार संघ राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 
मुलींच्या 14 वर्षाखाली स्पर्धेत सहकार विद्या मंदिरच्या मुलींनी प्राथमिक फेरीत एकहाती वर्चस्व ठेवले. अंतिम सामन्यात यवतमाळ संघाचा परभाव करीत राज्यस्तरावर प्रवेश निश्‍चित केला. ईश्‍वरी उंपलेचवार हिने विजयी गोल केला. 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात यवतमाळ संघाचा 3-1 ने पराभव केला. यामध्ये नयन बारोटे, राहूल पिसे व प्रतिक पवार यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
सहकार विद्या मंदिर ज्युनिअर सायन्स कॉलेच्या मुलींनी वयोगट 19 अंतर्गत यवतमाळ संघाचा 1-0 ने पराभव केला. रोलर हॉकी स्पर्धेत सहकारच्या विद्यार्थ्यांनी वयोगट 1 अंतर्गत अमरावती संघाचा 6-0 ने पराभव केला. यामध्ये सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून नयन बारोटे यांने 3 गोल तर राहूल पिसे व प्रतिक याने योगदान दिले.
वयोगट 14 मुलींच्या संघात ईश्‍वरी उपलेचवार, साक्षी वाघ, गौरी पाटील, वैष्णवी मानकर, अनुष्का धुमाळ, अस्मीता कायंदे, हर्षदा पाटील, भक्ती पोकळे, आस्था चक्कलवार, प्रेरणा मालवे, रसीका जाधव, वयोगट 19 मुलांच्या संघात नयन बारोटे, वैभव माने, सुमीत अंबुसकर, अभिषेक झोरे, अभिजित ताकोते, राहूल पिसे, प्रतिक पवार, सिध्देश दालू, ऋषिकेश गवळी, संकेत पानचाळ, यश दुसड, गुजन वरद यांचा समावेश होता. वयोगट 19 मुलींच्या संघात मृणाल मुंढे, मृणाली काटे, प्राची खानसरे, आस्था जमदाडे, सृष्टी कदम, रिध्दी काळे, वृषाली मगर, नयना काळे, वैष्णवी चांदवार, मिनल ठाकुर, पल्लवी सिंगारे, रोशनी जिरोळकर तर वयोगट 19 रोलर हॉकीच्या मुलांच्या संघात नयन बारोटे, वैभव माने, सुमीत अंबुसकर, अभिषेक झोरे, अभिजित ताकोते, राहूल पिसे, प्रतिक पवार, सिध्देश दालू, ऋषिकेश गवळी, संकेल पानचाळ यांचा समावेश आहे.