बक्षिसांचे आमिष दाखवून व्यापार्याला दहा लाखांचा गंडा
औरंगाबाद, दि. 10 - शहरातील एका व्यापार्याला विविध स्वरूपाच्या बक्षिसांचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्यांनी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनोज प्रेमसिंग चव्हाण रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी यांना 23 ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास घरी असताना, त्यांच्या मोबाइलवर रोहित नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने डील ऑन डोअर सर्व्हिस कंपनी लखनौ येथून बोलत असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करून त्याने कंपनीकडून विशिष्ट ग्राहकांची निवड केली जात आहे, आपण ऑनलाइन चार हजार रुपये भरल्यास लोटो कंपनीचा ट्रॅकसुट, बूट आणि सन गॉगल असा संपूर्ण सेट मिळेल असे सांगितले. त्यानंतर चव्हाण यांनी त्या भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाच हजार रुपये भरले. चव्हाण हे जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्या भामट्याने पुन्हा 25 ऑगस्टला संपर्क साधला. त्या वेळी त्याने ह्युंदई कंपनीच्या आय ट्वेन्टी कार बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याने, वीस हजार रुपये भरा, असे सांगितल्याने चव्हाण यांनी पुन्हा वीस हजार रुपये भरले. यानंतर त्याने वडिलांच्या नावे ओळखपत्र, आरटीओ फीस भरा असे सांगत 52 हजार रुपये उकळले. 29 ऑगस्टला भामट्याने पुन्हा संपर्क साधून 4 सप्टेंबरला प्रोझोन मॉलमधे आपल्या कंपनीने कार्यक्रम ठेवला आहे. तेव्हा तुमची कार तेथे मिळणार असल्याने कार्यक्रमाचा खर्च म्हणून 50 हजार रुपये भरा, हे पैसे परत केले जातील अशी थाप मारली. त्यामुळे चव्हाण यांनी पुन्हा 50 हजार रुपये भामट्याच्या खात्यात भरले. ही रक्कम हातात पडताच उदय यादव नावाच्या भामट्याने संपर्क साधून हा कार्यक्रम आता रद्द झाला असून, तो आता 18 सप्टेंबरला असल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कारणे सांगून चव्हाणकडून वेगवेगळ्या भामट्यांनी तब्बल नऊ लाख 90 हजार रुपये उकळले. हा प्रकार 4 ऑक्टोबरपर्यंत सतत सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी शुक्रवारी ता. सात जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.