Breaking News

आ.डॉ.राहुल पाटीलयांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता

परभणी, दि. 29 - परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे दरमहा मीळणारे वेतन एप्रिल 2016 पासुन थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली  होती.सदर प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने गटविकास अधिकारी परभणी यांच्याकडे वारंवार निवेदने देवुन  आपली मागणी लावुन धरली होती.गेली सहा-सात महिण्यापासुन हा प्रश्‍न निकाली न निघाल्यामुळे सदर कर्मचार्‍यांनी 26 ऑक्टोबर पासुन पंचायत समिती समोर  आमरण उपोषण आरंभले होते या उपोषणात एप्रिल 2016 पासुन थकलेले वेतन अदा करणे, कर्मचार्‍यांचे दस्तऐवज अद्यावत करणे, सी.पी.एफ.खात्यामध्ये रक्कम  भरणे तसेच राहणीमान भत्ता अदा करणे आदि मागण्याचा समावेश करण्यात आला होता.दि.27 ऑक्टोबर रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांनी सदर उपोषणात  मध्यस्थी करून गटविकास अधिकारी श्‍वेता काळे यांची भेट घेवुन हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी प्रयत्न  करावा अशी मागणी केली होती या वरून गट विकास  अधिकार्‍यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधुन सदर कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य केल्या. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून थकीत वेतनाची अदायगी सुरू  करण्याचे आश्‍वासन देवून कर्मचार्‍यांच्या इतर मागण्या लवकरच सोडवण्यात येतील असे सांगीतले यामुळे कर्मचार्‍यांचे प्रश्‍न निकाली निघाले असुन आ.डॉ.राहुल  पाटील यांच्या मध्यस्थीमुळे कर्मचार्‍यांना न्याय मिळाल्याची भावना कर्मचार्‍यांनी व्यक्त करून दाखवली.