Breaking News

पुजा गवई जिल्ह्यातून प्रथम

देऊळगांव मही (प्रतिनिधी), दि. 29 -  स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची कु.पुजा दिलीप गवई या विद्यार्थीनीने जिल्हा क्रीडा संकुल  बुलडाणा येथे आयोजित जिल्हास्थरिय 1500 मिटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. कु.पुजा हिने जिल्हाभरातुन आलेल्या निवडक  स्पर्धकांवर मात करत प्रथम प्राप्त केला. त्यामुळे तीची निवड जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी विभागीय स्तरावर झाली आहे. तिच्या या यशाचे बद्दल  महाविद्यालयात तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वि.ए.बाहेकर तसेच पर्यवेक्षक म.वि.गाभणे तसेच सर्व शिक्षकवृंद  उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्राचार्यंनी कु.पुजा हिने आपल्या लौकीकाला साजेशी कामगीरी करत गाव व महाविद्यालयाचे नाव उज्वल केले असे उद्गार  काढले व तिला मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक वि.तु.गवई व सौ.किरणताई गाभणे यांचे अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल अध्यक्ष डॉ.अनिलकुमारजी गाभणे  सचिव किशोर गाभणे, संचालक शे.ब.सुरूशे यांनीही तिचे अभिनंदन केले. तिच्या या यशाचे श्रेय ती आई वडील गुरूजन यांचे आर्शिवाद यांना देते. तिच्या या  यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.