Breaking News

हमाल-मापाडी प्रतिनिधी म्हणून कोतकरांची निवड

। स्व.शंकरराव घुले यांची परंपरा आजही कायम । अण्णांच्या आदर्शानुसारच निवड : घुले

अहमदनगर (प्रतिनिधी) । 29 - स्व.शंकरराव घुले यांचा आदर्श कायम ठेवत नगर मार्केट कमिटीमध्ये हमाल मापाडी प्रतिनिधी म्हणून बहिर सबाजी कोतकर यांची  बिनविरोध निवड झाली. गेल्या 25 वर्षापासून मार्केट कमिटीमध्ये हमाल मापाडी एक प्रतिनिधी देण्याची शाश्‍वत निर्णय झाला तेव्हापासून अहमदनगर जिल्हा हमाल  पंचायतचे अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांनी बिनविरोध प्रतिनिधी निवडून दिले. तिची परंपरा कायम ठेवीत हमाल पंचायतचे नूतन अध्यक्ष अविनाश घुले यांनी मार्केट  कमिटीवर बहिरु सबाजी कोतकर यांना बिनविरोध निवडून दिले आहे. हमाल पंचायतचा हा आदर्श सर्वांनी घ्यावा. हमाल पंचायतच्या सर्व संस्थांच्या निवडणूका  अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध झाल्या आहेत.या निवडीबद्दल हमाल पंचायतच्यावतीने अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात  आला.
याप्रसंगी कोतकर यांनी सांगितले, मार्केट कमिटीच्या माध्यमातून हमाल मापाडी स्त्री हमाल यांचे प्रश्‍नांमध्ये लक्ष घालून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले जातील. मार्केटमधील  सर्व घटकांना बरोबर घेऊन कामकाज करण्यात येईल. स्व.अण्णांचा आदर्श घेऊन अविनाश घुले यांचे मार्गदर्शनाखाली कार्य करील, असे सांगितले. याप्रसंगी  अविनाश घुले म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांनी वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन बिनविरोध निवडणुका कशा होतील, ते दाखवून दिले  होते. आज आम्ही त्यांचाच वारसा पुढे चालवत आमच्या विभागाची निवड बिनविरोध करण्यात यशस्वी झालो आहोत. हमाल पंचायतीमध्ये आजपर्यंत कुठल्याच  विभागाची निवडणूक झाली नसून, त्यामध्ये होणारा वारेमाप खर्च कष्टकर्‍यांना न परवडणार आहे. म्हणूनच आम्ही सर्वांशी विचार विनिमय करुन प्रत्येक गोष्टीवर  योग्य तो निर्णय घेऊन ही निवड बिनविरोध केली, असे सांगितले.
यावेळी गोविंद सांगळे, मधुकर केकाण, सतीष शेळके, लक्ष्मीबाई कानडे, संजय घुले, किसन सानप, बबन आजबे, सचिन ठुबे, बच्च कोतकर, शेख रज्जाक,अण्णा  उरमुडे, मच्छिंद्र हुलगे, मच्छिंद्र दहिफळे, भानुदास भगत, सुधीर कार्ले,अशोक ताकटे, रामा पानसंबळ, नवनाथ लोंढे, गोरखे हुलगे, शशी वाळके, मोहन सापते,  रविंद्र भोसले आदि सर्व कार्यकर्ते, हमाल-माथाडी उपस्थित होते.