Breaking News

पेठचे दिनकराव पाटील शेळके पुन्हा कॉगे्रस मध्ये

बुलडाणा, दि. 29 - चिखली मतदार संघातील मौजे पेठ येथील दिनकरराव शेळके पाटील यांनी आपल्या महिना दोन महिन्याच्या भाजप मधील प्रवासा नंतर  भाजप नेतृत्वा विषय भ्रमनिराश झाल्याने पुन्हा आमदार राहुल बोंदे्र यांचे नेतृत्व सरस असल्याचे मान्य करीत कॉगे्रसमध्ये प्रवेश केला.
कॉगे्रस मधून महिन्या दोन महिन्यापुर्वी भाजप मध्ये प्रवेश केलेले दिनकरराव शेळके पाटील यांचे भाजप मधील महिन्या दोन महिन्याचे वास्तव्या नंतर  तेथील नेतृत्वा विषयी भ्रमनिराश झाल्याने पुन्हा कॉगे्रस मध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त करीत आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2016 रोजी बुलडाणा  जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करीत कॉगे्रसमध्ये प्रवेश घेतला आहे. आपला कॉगे्रस प्रवेशाचा निर्णय  निश्‍चित झाल्यावर त्यांनी आपल्या समर्थकासह आमदार राहुल बोंद्रे यांचे निवासस्थानी कॉगे्रसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पेठ येथील डॉ. गुलाबराव सपकाळ,  कॉगे्रस कमिटीचे तालुका अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, संजय पांढरे, माजी नगराध्यक्ष पप्पुसेठ हरलालका, युकॉचे माजी जिल्हाध्यक्ष धनंजय देशमुख, रामभाउ  जाधव, भिमराव जाधव व साहेबराव म्हस्के, यांची प्रमुख उपस्थिती होती.