Breaking News

अ‍ॅड.चौधरी लिखित उमलत्या कळ्यांसाठी दोन शब्द कायद्याचे पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर, दि. 26 - कुमारवयीन मुला मुलींच्या जीवनात येणार्या अडचणी संदर्भात त्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शक ठरणार्या अ‍ॅड.निर्मला चौधरी लिखित  उमलत्या कळ्यांसाठी दोन शब्द कायद्याचे या पुस्तकाचे प्रकाशन उच्च न्यायलय औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमुर्ती एस.एस. शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले.   
कल्याण महामार्गावरील इंडीयन मेडिकल कॉन्फरन्सच्या हॉलमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना अनुकूल कायदेशीर सेवा आणि त्यांचे सरंक्षण योजनानेच्या माहिती विषयी मार्गदर्शन व्याख्यानाप्रसंगी या पुस्तकाचे  प्रकाशन करण्यात आले. यावेळी यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीकांत कुलकर्णी, फ्लेविया अ‍ॅग्नेस, जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील, शहर बार  असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण कचरे, लेखिका अ‍ॅड.निर्मला चौधरी आदिंसह न्यायधीश, बालकांवर काम करणार्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व वकिल मंडळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अ‍ॅड.निर्मला चौधरी न्यायधार संस्थेच्या माध्यमातून महिला व बालकांच्या प्रश्‍नांवर काम करत आहे. या पुस्तकाच्या माध्यामातून मुलांवर येणार्‍या अडचणी  सोडवण्यासाठी त्यांनी प्रबोधन केले आहे.