Breaking News

अंजलीचे कर्तृत्व व कुस्ती खेळातील योगदान आजच्या युवतींना प्रेरणादायी

अहमदनगर, दि. 26 - अंजलीच्या माध्यमातून चालू असलेला महिला स्वसंरक्षणाचा उपक्रम राष्ट्राला दिशा दर्शक असून, हे कार्य चळवळीच्या रुपाने वाढले पाहिजे.  अंजलीच्या कुस्ती क्षेत्रातील कार्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत व्यक्त केली. ती महाराष्ट्राची हिरकणी असून, अंजलीचे कर्तृत्व व कुस्ती खेळातील  योगदान सिनेमाच्या रुपाने आजच्या युवतींना प्रेरणादायी ठरणार आहे. ग्रामीण भागातील एक महिला कुस्तीपटूचा संघर्ष राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी  लवकरच अंजलीवर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा प्रसिध्द मराठी सिने दिग्दर्शक दीपक कदम यांनी केली.
संपुर्ण देश हलवणार्‍या कोपर्डी घटनेनंतर महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार्या आंतराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर वल्लाकट्टी यांचा दीपक कदम यांनी  सत्कार केला. कदम यांनी नुकतेच अंजली देवकर वल्लाकट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. अंजलीच्या कुस्ती संघर्षाची व सामाजिक  कार्याची माहिती घेऊन तीच्यावर सिनेमा बनवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी कार्यकारी निर्माता राजेंद्र सावंत, जितेंद्र वल्लाकट्टी, प्रकाश थोरात, शेखर आंधळे,  एकनाथ राऊत आदि उपस्थित होते.
अंजलीने ग्रामीण भागात मुलींना कुस्ती खेळ खेळताना येत असलेल्या अडचणी मांडल्या. आपल्या संघर्षमय जीवनपट उलगडून दाखवला तसेच शिवछत्रपती  पुरस्कारासह मिळालेल्या अनेक पुरस्काराची माहिती दिली व भारताच्या महिला संघास पोलंड, जपान, रशीया, थायलंड आदि देशात प्रशिक्षक म्हणून गेल्या असता  आलेला अनुभव विशद केला.