Breaking News

कुस्ती स्पर्धेत गुंजाळवाडी शाळेचे यश

पुणे, दि. 27 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, पुणो आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत  नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुंजाळवाडी शाळेतील 15 खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूमंध्ये स्वप्नील सोलाट (42 किलो), संग्राम ढवळे (46 किलो), निखिल शिंदे (54 किलो), समीर तोडकर (58 किलो), ऋ षीकेश  वायकर (76 किलो), निकिता गुळवे (56 किलो), सौरभ सोलाट (58 किलो), मयूर शिंदे (76 किलो), विराज सोलाट (42 किलो), प्रफुल्ल वायकर (54  किलो), नेहा गुळवे (46 किलो), तेजस ढवळे (50 किलो), निरंजन चव्हाण (42 किलो), अंतरा तोडकर (56 किलो) यांचा समावेश आहे. यापैकी प्रथम क्रमांक  मिळवणार्‍या खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे व ए. बी. कानडे यांचे मार्गदर्शन  लाभले. डॉ. श्रीकांत विद्वांस, नंदा डांगे, प्रकाश पाटे, सरपंच युवराज शिंदे, श्रीकांत वायकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.