आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून धडा घेऊ : स्मिथ
केपटाऊन, दि. 14 - आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा संघ नक्कीच धडा घेईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने व्यक्त केले आहे.
या मालिकेत आम्ही नवोदितांना संधी दिली होती. सध्याच्या वेळापत्रकानुसार अनुभवी वेगवान गोलंदाजांना दीर्घकाळ गोलंदाजी करणे कठीण जाते. त्यामुळे मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांना विश्रांती देऊन त्याऐवजी नवोदित गोलंदाजांना संधी देण्यात आली. ही मालिका संघाच्या दृष्टीने कठीण होती. त्यामुळे यातून आम्ही नक्कीच धडा घेऊ आणि सुधारणा करू, असेही तो म्हणाला.