काश्मीरमधील ‘एनआयटी’ साठी 100 कोटी मंजूर
नवी दिल्ली, दि. 14 - जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या निधीपैकी 50 कोटी रुपये हे जम्मू, काश्मीर आणि लडाख येथे तीन वसतीगृहे उभारण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली.
जम्मूमध्ये आयआयएम सुरु करण्यास सरकारने मंजुरी दिल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली.
जम्मूमध्ये आयआयएम सुरु करण्यास सरकारने मंजुरी दिल्याचे जावडेकर यांनी सांगितले.