अर्जेंटिनाविरुद्धची लढत कोरियाचा सलग दुसरा विजय
अहमदाबाद, दि. 10 - भारतास सलामीस धक्का देणार्या कोरियाने विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेतील दुसर्या विजयाची नोंद केली. मात्र, रविवारी झालेल्या अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत त्यांना विश्रांतीच्या 44-12 अशा मोठ्या आघाडीनंतरही 68-42 अशा विजयावर समाधान मानावे लागले. कोरिया शतकी मजल मारणार, असेच चित्र असताना बचावातील चुकांमुळे त्यांना आपला गुणफलक वाढवता आला नाही.
दी एरीना ट्रान्सस्टेडिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथमच भारताची लढत नसलेला दिवस आला, तरी दोन हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियममधील निम्मे भरले होते. नवरात्रीतील अखेरचा रविवार असूनही ही गर्दी काहीशी धक्कादायक होती. त्यांना कोरियाची लढत एकतर्फीच होईल, असे वाटले होते, पण कोरियाने उत्तरार्धात प्रमुख आक्रमकांना विश्रांती दिली, तर त्याचवेळी बचावात चूका होण्यास सुरवात झाली. त्यामुळेच अर्जेंटिनास समाधानकारक लढत देता आली. सुरवातीस झटपट तीन लोण देणार्या कोरियाला त्यानंतर दोन लोण स्वीकारावे लागले. कोरियाने अंतिम टप्प्यात चौथा लोण देत लढतीचा निकाल स्पष्ट केला खरा, पण त्यांना हा निसटता विजय सलत होता. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी पर्यायी खेळाडू तपासण्याची गरजच होती. त्यांच्याकडून झालेल्या चुका आता सरावात कशा दूर होतील, याकडे लक्ष द्यावे लागेल, असे कोरियाचा कर्णधार डाँग जी हाँग याने सांगितले.
इराणचे सहा लोण
इराणने सहा लोण देत थायलंडचा सुरवातीचा माफक प्रतिकार सहज परतवला. थायलंडने सुरवात चांगली करताना एक सुपर टॅकल केली होती, तसेच एका चढाईत दोन गुणही घेतले होते, पण इराणी आक्रमण सुरू झाल्यावर किती मिनिटात लोण होणार, हेच औत्सुक्य राहिले. इराणने अखेरच्या मिनिटात एक लोण स्वीकारत थायलंडला आगामी लढतीसाठी उत्साह कायम राहील, याचीच जणू काळजी घेतली. इराणने सामन्यात चौदा जण एकंदर खेळवले. त्यातील बारा जणांनी गुण घेत इराणला 64-22 असे विजयी केले.
जपानचा धडाका
अमेरिकेला प्रतिकाराचीही संधी न देता जपानने आपली मोहीम सुरू करताना अमेरिकेचा 45-12 असा पाडाव केला, पण आशियाई शेजारी असलेल्या कोरियाप्रमाणे जपाननेही पूर्वार्धातील एकतर्फी वर्चस्वानंतर उत्तरार्धात लढत चुरशीची केली. पूर्वार्धातील 29-6 एकतर्फी वर्चस्वानंतर जपानला उत्तरार्धात 16-13 अशी निसटती आघाडीच राखता आली. जपानने अमेरिकेला एकही लोण घेऊ दिला नाही, पण त्याचवेळी तीन लोण चढवले. जपानने लढतीचे रंग ओळखल्यावर आघाडी खेळाडूंना विश्रांतीच दिली.