अश्विनच्या फिरकीसमोर न्यूझीलंडची घसरगुंडी, निम्मा संघ तंबूत
इंदूर, दि. 10 - इंदूर कसोटीत आर अश्विनच्या प्रभावी मार्यासमोर न्यूझीलंडची चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. एक बाद 118 धावांवरुन न्यूझीलंडची पाच बाद 148 अशी केविलवाणी अवस्था झाली. उपाहारानंतर अश्विननं प्रभावी मारा करुन न्यूझीलंडचं अक्षरश: कंबरडे मोडले आहे. अश्विनने चार विकेट्स काढून गप्टिलला धावचीत करण्यातही मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडने आतापर्यंत पाच बाद 154 धावांची मजल मारली असून बीजे वॉटलिंग दोन आणि जेम्स नीशाम 4 धावांवर खेळत आहे. त्याआधी गप्टिल आणि टॉम लॅथमनं 118 धावांची सलामी दिली. टॉम लॅथमने 53, तर गप्टिल 72 धावांची खेळी केली. दरम्यान, भारताने पहिला डाव 5 बाद 557 धावांवर घोषित केला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 365 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताला ही मजल मारता आली.