गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले
लखनऊ, दि. 24 - अखिलेशने सरकार चालवावे, तर शिवपालने पक्ष चालवावा असे आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्तासंघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली.
बैठकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर मुलामय यांनी काका-पुतण्याची गळाभेटही घडवून आणली..मात्र अवघ्या काही सेंकदात दोघांमध्ये पुन्हा ठिणगी पडली. अखिलेश खोटे बोलतो असा आऱोप शिवपाल यांनी केला. विशेष म्हणजे व्यासपीठावरच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
अमरसिंहांवर आसूड ओढणार्यांना, मुलायम यांनी अमरसिंह आणि शिवपालला कधीच अंतर देणार नाही असे ठकणावले आहे.त्यामुळे मुलायम यांचा तात्पुरता इलाज किती काळ टिकणार हे पाहावे लागेल. पक्ष चालवण्यावरुन अखिलेश आणि शिवपाल यांच्यात अनेक मतभेद सातत्याने उफाळून येत असल्याने यादव कुटुंबात गृहकलह निर्माण झाला आहे.