हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ, अखेर ट्रस्ट नमले !
नवी दिल्ली, दि. 24 - अखेर हाजी अली ट्रस्ट सुप्रीम कोर्टात नमले आहे. कारण हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्ट राजी झाले आहे. सुप्रीम कोर्टात ट्रस्टने त्याबाबतचे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती मान्य करत हायकोर्टाने महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती. 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र हाजी अली ट्रस्टने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होते. यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात ट्रस्टींनी महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ असं सांगितले. जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे, तिथपर्यंत महिलांनाही प्रवेश देऊ, असे ट्रस्टींनी सांगितले.