एन्जॉय कारच्या किंमतीत तब्बल 1.93 लाखांची कपात
मुंबई, दि. 24 - शेरवोलेट कार कंपनीने एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. एन्जॉय कारच्या किंमतीत तब्बल 1.93 लाख एवढी कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एन्जॉयच्या विक्रीत वाढ होण्याची कंपनीला आशा आहे.
मारुतीची अर्टिगा आणि होंडाची मोबिलिओच्या तुलनेने एन्जॉय ग्राहकांवर फार छाप पाडू शकले नव्हते. त्यामुळे याचे उत्पादन बंद होण्याचीही चर्चा होती. पण किंमतीत घट केल्याने ग्राहक एन्जॉयकडे आकर्षित होऊ शकतात अशी कंपनीला आशा आहे.
किंमतीत कपात केल्यानंतर आता एन्जॉयच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या बेसिक मॉडेलची किंमत 4.99 लाख एवढी झाली आहे. तर 8 सीटर डिझेल बेस व्हेरिएंट एलएसची किंमत 5.99 लाख रुपये झाली आहे. पेट्रोल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलच्या किंमत 1.8 लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता 6.24 लाख झाली आहे. तर डिझेल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलमध्ये 1.93 लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता 9.17 लाख झाली आहे. एन्जॉय पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. तसंच दोन्ही इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.