Breaking News

ठाकरे संपत्ती वाद : संजय राऊतांचीही साक्ष होणार

मुंबई, दि. 28 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्ती वादात आता सेना खासदार संजय राऊत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. येत्या 5 डिसेंबरला मुंबई उच्च  न्यायालयात संजय राऊतांची साक्ष नोंदवली जाईल.
जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेत उद्धव ठाकरेंना कोर्टात खेचलं आहे. याप्रकरणी जयदेव ठाकरेंनी उच्च न्यायालयात साक्षीदारांची यादी  सादर केली. ज्यात संजय राऊतांचंही नाव आहे.
पण, गेल्या सुनावणीवेळी राऊत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळं नाराज झालेल्या कोर्टानं संजय राऊतांना 5 डिसेंबरला उपस्थित राहण्यासाठी समन्स  बजावला आहे. राऊत साक्ष देण्यासाठी आले नाही तर त्यांना आणावे लागेल, असा इशारा न्यायालयाने दिला होता. अखेर ते साक्षीसाठी तयार आहेत. ‘सामना’चे  संपादक या नात्यानं संजय राऊतांची साक्ष नोंदवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात त्यांची साक्ष नोंदवावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र त्यांची साक्ष येत्या 5 डिसेंबरला होईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही  सुनावणी तहकूब केली. बाळासाहेबांचे मृत्यूपत्र प्रमाणीत करून घेण्यासाठी अनिल परब यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर जयदेव ठाकरे यांनी आक्षेप  घेतला. त्यानंतर मृत्यूपत्राबाबत न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.