Breaking News

किल्ले बनवा स्पर्धेस प्रतिसाद

। राजे क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम

शेवाळेवाडी (ता. हवेली), दि. 26 - येथील राजे क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत झालेल्या स्पर्धेत 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्वत:च्या हाताने मातीचे किल्ले बनवण्याचा आनंद मुलांना मिळावा, त्यांच्यात सहकार्याची भावना वाढावी आणि इतिहासाची ओळख व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी किल्लयांच्या प्रतिकृती साकारल्या. राजगड, प्रतापगड, शिवनेरी असे किल्ले मुलांनी साकारले. स्पर्धेसाठी शाळेचे  मुख्याध्यापक चंद्रकात जगताप व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.क्लबचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस अमित पवार म्हणाले, टीव्ही,  संगणक व मोबाइलमध्ये रमणार्‍या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची माहिती होण्याची आवश्यता आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा  देण्यात आला. या वेळी मुलांसाठी चित्रकला, ग्रीटिंग कार्ड बनविणो, पणत्या रंगविणो, मुलींसाठी रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे बक्षीस वितरण  अमित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी दोडमिसे, शिक्षण समिती सदस्या रसिका कुंभारकर, नीलेश भागवत आदी उपस्थित होते.