Breaking News

13 अपक्षांसह सेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

। 177 सोसायट्यापैकी 115 सोसायट्या राष्ट्रवादी व काँग्रेस च्या ताब्यात ।  

श्रीगोंदा (प्रतिनिधी)। 26 -  श्रीगोंदा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस , भाजप आणि शिवसेना अशा तीन पॅनेलचे 54 उमेदवार आणि 13 अपक्ष  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.पैकी  राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पॅनेलचे दहा आणि भाजपच्या पॅनेलचे आठ उमेदवार निवडून आले असून 13 अपक्षांच्या आणि  शिवसेनेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 18 अशा 31 उमेदवारांच्या अनामत रक्कमा महाराष्ट्र  सहकारी संस्था निवडणूक नियम, 2014 मधील कलम 70(4) नुसार  जप्त  झाल्या आहेत.
      श्रीगोंदे तालुक्यात एकूण 177 सोसायट्या असून त्यातील 115 सोसायट्या राष्ट्रवादी व काँग्रेस च्या ताब्यात आहेत. या पॅनेलला सुमारे 1300 मते अपेक्षित  होती. परंतु त्यांना सरासरी 1003 मते पडली असून 300 मतांचा फटका बसला आहे. भाजपकडे 55 सोसायट्या असून, त्यांना सुमारे 640 मते अपेक्षित होती  परंतु त्यांना सरासरी 897 मते पडल्याने त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची 250 मते खेचून आणली.शिवसेनेकडे सुमारे सात- आठ सोसायट्या असून त्यांना 80 मते  अपेक्षित होती परंत्य त्यांना सरासरी 119 मते पडल्याने त्यांनी 40 मतांचा फटका राष्ट्रवादी व काँग्रेसला दिलेला आहे.
      ग्रामपंचायत मतदार संघात 40 ग्रामपंचायती  राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात असून त्यांना 360 मतांची अपेक्षा होती. परंतु त्यांनी सरासरी 370 मते  मिळविली. भाजपकडे 40 ग्रामपंचायती आहेत त्यांना 360 मतांची अपेखा होती परंतु त्यांना सरासरी 385 मते पडली. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत  मतदार संघात  चार पैकी 3 जागा मिळविल्या.शिवसेनेकडे चार  ग्रामपंचायती आहेत, त्यांना 36 मते अपेक्षित होती, परतू त्यांना सरासरी 38 मते पडलेली आहेत. शिवसेनेच्या  पॅनेलचा फायदा पाचपुतेंच्या भाजपला झाला. कारण  त्यांना मिळालेल्या मतांतील 75 टक्के मते नागवडे - जगताप यांची आहेत.
   मागील संचालक मंडळात नागवडे, जगताप व नाहाटा यांचे 18 पैकी 13 संचालक होते व पाचपुते यांचे पांच संचालक होते.आता राष्ट्रवादी व काँग्रेसची संख्या  तीन ने घाटल्याने पाचपुते यांच्या संचालकांची संख्या पांच ऐवजी आठ झाली आहे. नागवडे आणि नाहाटा यांच्यातील संघर्ष टोकाला जावून त्याची संबध  तालुक्यात चर्चा झाली. नाहाटा यांच्या विरोधात नागवडे यांनी कार्यकर्ते उच्च न्यायालयात पाठविले. याचा फायदा पाचपुते गटाने उठविला. खर तर नाहाटा यांना  संपविण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेपासून नागवडे आणि पाचपुते एकत्र आले होते.परिणामी राष्ट्रवादी व काँग्रेसला तीन जागांचा फटका बसून बाळासाहेब नाहाटा  यांना सहाव्या क्रमांकावर मतदारांनी फेकले. 35 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव वाचला. त्यांना विरोधी पॅनेलने लक्ष्य केले होतेच, पण पॅनेलमधील काही नेत्यांनी  नाहाटा यांना फटका दिल्याची चर्चा आहे.
      राष्ट्रवादी व काँग्रेस मधील नेत्यांची मने आजही एकमेकांबद्दल कलुषित आहेत. मार्केट कमिटी निवडणुकीत ते दिसून आले आहे. वेळीच  आत्मपरीक्षण करून  मनोमिलन झाले नाही, तर त्याचा फटका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला बसून, बबनराव पाचपुते  या  बाबीचा फायदा  उठविल्याशिवाय राहणार नाहीत.