Breaking News

रक्तदान शिबीरात 148 जणांचे रक्तदान

। प्रबोधिनीचे हे 16 वे रक्तदान शिबीर होते । सख्ये भांवडांनी केल रक्तदान 

अहमदनगर, दि. 26 - भिंगार येथील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी (ट्रस्ट) ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 148 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  यामध्ये दहा महिला, माता पुत्र, पिता पुत्र, एका दाम्पत्यांसह काही सख्या भावंडांनी व प्रतिष्ठीतांनी रक्तदान केले. प्रबोधिनीचे हे 16 वे रक्तदान शिबीर होते.
नगरमधील  जन कल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने व प्रबोधिनी संचालक रुपेश भंडारी यांचे वडिल स्व.चंद्रकांत भंडारी यांच्या स्मरणार्थ केलेल्या आर्थिक  मदतीतुन खळेवाडीतील देशमुख सांस्कृतिक हॉलमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. उद्घाटनाचा कोणताही डामडौल न करता शिबीर सुरु करण्यात आले. पहिल्या  रक्तदात्या पासून तर शेवटच्या रक्तदात्यापर्यन्त यासर्वांना प्रबोधिनी अध्यक्ष प्रमोद मुळे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी 98 व्या वेळेस रक्तदान  केल्याबद्दल श्री जयंत भागवत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या शिबीरास नगर जनकल्याण रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.दिलीप धनेश्‍वर, प्रबोधिनीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. जयदिप देशपांडे, तसेच बाळासहोब पतके, श्रीकांत  नांगरे सुनिल लालबोंद्रे, विष्णु घुले, अमित काळे, लोकेश मेहतानी, पप्पुशेठ भुतकर, रविंद्र लालबोंद्रे, संजय सपकाळ, विजय नामदे, किशोर काटोरे, प्रणव  धर्माधिकारी, राम शिंदे,  सदाशिव शिंदे यासह सामाजिक, राजकिय व विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
या रक्तदानात डॉ.विकास सोनवणे, वसंत राठोड, सचिन जाधव, गणेश साठे, श्रीकांत वराडे, दिलावर पठाण, रविंद्र भिंगारदिवे, सय्यद शाहिद महंमद, रणासिंह  चौहाण, गोकुळ धाडगे, प्रविण भोकरे, प्रशांत छजलानी, शाम खेले, शिरीष वराडे, सुधाकर गिलशेर, विवेक बिडवाई या विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांचा  समावेश  होता.
या रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ्य म्हणजे धनंजय नामदे मनिषा नामदे (पतीपत्नी), सौ.सविता नंदू नायकु व अभिषेक नायकु (मातापुत्र), राम घुले व लाभेश्‍वरी घुले  (वडील मुलगी), गणेश तोतरे सर्वेस तोतरे (वडील मुलगा), रविंद्र व वसंत राठोड, प्रशांत व विशाल नागपुरे, संतोष व किरण शेलुकर, सत्यम, शिवम (प्रज्योत),  संदुरम लुणिया या सख्या भावंडांनी रक्तदान केले. पालकांनी आपल्या पाल्यावर रक्तदानाचे संस्कार सुरु केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिबीरासाठी  प्रा. एकनाथ जगताप, संजय शिंदे, माधव भांबुरकर, रमेश वराडे, ओंकार देऊळगावकर, निलेश साठे,  महेश नामदे, किरण मुळे, मयुर जोशी, बंडोपंत बेेद्रे,  भालचंद्र मुळे, सचीन पेंढुरकर, दामोधर माखिजा, विजय काळे, मंगेश धोकटे, गोरख वामन, व श्याम रासकर, संजय रायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच  जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.गुलशन गुप्ता, जनसंपर्क अधिकारी श्री.सावंत, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी प्रबोधिनी उपाध्यक्ष  सुभाष त्रिमुखे, संचालक अशोक एकबोटे, शिवप्रसाद काळे, कृष्णा पराते, प्रकाश मुळे, सुभाष रासने, श्रीपाद मुंगी, चंद्रशेखर चौधरी, विठ्ठलराव लोखंडे, रुपेश  भंडारी, सौ.सुजाता झांबरे, सौ.विजया देशमुख, सौ.शशिकला शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले.  आता पर्यंत एकूण 16 रक्तदान शिबीरातून 1968 रक्तपिशव्यांचे  संकलन केले. आपण रुग्णांकरिता दिलेले रक्त हे जीवनदान देणारे अमृत ठरते तसेच थॅलेसेमीया रुग्णांना निश्‍चित उपयोग होतो असे सांगुन कार्याध्यक्ष सुधीर  कुलट यांनी रक्तदात्यांचे व सहकार्यकरणार्‍या सर्वांचेच आभार मानले.