Breaking News

माझं शहर हेच माझं घर : सौ. वेदांतिकाराजे

सातारा, दि. 29 - वीसाव्या वर्षी माझं लग्न झालं तेव्हापासून मी सातार्‍यात राहते. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी सातार्‍यात कार्य करते तर, सातार्‍यातच  मी शैक्षणिक कार्य करत आहेत. मी एक गृहीणी आहे. मी माझ्या कुटूंबाची काळजी घेते. जे मी माझ्या घरासाठी करते तेच मी माझ्या शहरासाठी करणार आहे.  माझी उमेदवारी म्हणजे प्रत्येक महिलेची उमेदवारी आहे. त्यामुळे प्रत्येक महिला नगराध्यक्ष असणार असून पालिकेच्या कामकाजात लोकसहभाग असणार आहे.  मला हातात झाडू घ्यायला कधीही लाज वाटली नाही. रस्ता झाडण्याचे कार्य प्रथम कर्तव्य सोशल ग्रुपने केले आहे. सातारा शहरासाठी माझ्यासह नविआच्या सर्व  उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.