आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
मुंबई, दि. 01 - आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी राज्यातील सर्वच शक्तीपीठांची मंदिरे सज्ज झाली आहेत. आज मंदिरांसह घरोघरी देवीच्या स्थापना केली जाणार आहे.
महाराष्ट्रात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण, तर नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात नवरात्रीला विषेश महत्त्व आहे. आजपासून येथे मोठ्याप्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
आज सकाळी नाशिकच्या वणी गडावर सप्तश्रृंगी देवीची अलंकार महापुजा करण्यात आली. महापुजेनंतर सप्तश्रृंगीच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावलेल्या आहेत. नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुढचे नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.